रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर गश्मीर महाजनीची पोस्ट, म्हणाला…
ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. तळेगाव आंबी एमआयडीसी येथील सोसायटीमध्ये महाजनी राहायचे. त्यांचा मृतदेह सापडण्याच्या तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असं पोलिसांनी सांगितलं होतं.
यासर्व प्रकारानंतर त्यांचा मुलगा व प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनीला सोशल मिडियावर ट्रोल करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता अभिनेता गश्मीर महाजनीने यावर उत्तर दिले आहे.
गश्मीर महाजनी यांने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत गश्मीर महाजनी म्हणाला की, अभिनेता हा कायमच अभिनेता असतो. या प्रकरणानंतर मी, माझ्या कुटुंबाने, जवळच्या व्यक्तींनी मौन बाळगणं पसंत केलं. आम्ही शांत राहिल्याने अनेक जण द्वेष करत आहेत, शिव्याही देत आहे आणि आम्ही त्याचंही स्वागतच करतो. आपल्यातून निघून गेलेल्या त्या आत्म्याला देव शांती देवो. ओम शांती. ते माझे वडील होते आणि माझ्या आईचे पती होते. आम्ही त्यांना तुमच्या सर्वांपेक्षा जास्त चांगलं ओळखतो. मी याबद्दल भविष्यात कधीतरी वेळ आल्यावर नक्कीच बोलेनच. अशी पोस्ट गश्मीरने शेअर केली आहे.