'गणपत'चा टीझर रिलीज; पाहा टायगर श्रॉफचा जबरदस्त लूक

'गणपत'चा टीझर रिलीज; पाहा टायगर श्रॉफचा जबरदस्त लूक

अभिनेता टायगर श्रॉफचा 'गणपत'चा टीझर रिलीज झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अभिनेता टायगर श्रॉफचा 'गणपत'चा टीझर रिलीज झाला आहे. टायगर श्रॉफ त्याच्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी गणपत चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. नुकतेच आता गणपत चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

या चित्रपटात टायगरचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफ आणि क्रिती सनॉन यांची धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा वेगळाच लूक आपल्याला पाहायला मिळणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com