200 किलो वजनापासून ते 98 किलो वजनापर्यंत...
गणेश आचार्या (Ganesh Acharya) हा बॉलिवुडमध्ये सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक (Choreographer) आहे. अलिकडेच त्याने त्याचा 51वा वाढदिवस साजरा केला आणि त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगताना दिसत आहे. उत्तम नृत्यशैली यामुळे तो नेहमीच चर्चेत आला आहे, पण त्याच बरोबर तो त्याच्या वजनामुळे देखील नेहमी चर्चेत राहिला आहे. मात्र काहि वर्षांनपुर्वीच गणेश आचार्याने त्याच्या फिटनेसवर काम करण्यास सुरूवात केली.
येवढंच नाहितर, त्याने 200 किलो वजन थेट 98 वर आणून ठेवलं आहे. अवघ्या काही काळातचं त्याच्यात झालेला बदल पाहुन त्याचे चाहते थक्क झाले आहेत. त्याने त्याच्या एका मुलाखतीमध्ये यावर भाष्य केले आहे. वजनदार कौशल्य असतानाही उत्तम नृत्यदिग्दर्शक आणि डान्सर म्हणून तो नेहमी चर्चेत असायचा.
2015 मध्ये त्याचे वजन 200 किलो होते मात्र स्वत:साठी घेतलेल्या अथक परिश्रमानंतर त्याने अवघ्या काही काळातचं वजन कमी करून 98 वर आणून ठेवलं आहे. या वेट लॉस (Weight loss) विषयीची माहिती त्याने 2017 मध्ये दिली होती तरी ती मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. इंस्टाग्रामवरही (Instagram) त्याचे फिटनेसचे व्हिडीओ व्हायरल होतानाचे दिसत आहेत.
मुलाखती दरम्यान त्याने सांगितले की, वजन कमी करण्याचा काळ माझ्यासाठी अत्यंत कठीण होता. दीड वर्षांपासून मी विविधप्रकारे आणि तज्ञ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतो. एका "हे ब्रो" या चित्रटासाठी मी माझे 20 ते 30 किलो वजन वाढवले होते, पण त्यानंतर माझे वजन वाढतचं जावून 200 वर पोहचले असे म्हटंले होते. त्याच्या अथक प्रयत्नानंतर तसेच डायट, जिम अश्या अनेक पद्धतीने वजनावर नियंत्रण आणले.