Jhund
JhundTeam Lokshahi

झुंड हा चित्रपट 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

'झुंड' हा चित्रपट OTT फ्लॅटफॉर्मवर उद्या म्हणजेच 6 मेला प्रदर्शित होणार
Published by :
shamal ghanekar
Published on

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' हा चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) पाहता येणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'झुंड' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पण आता ही प्रतिक्षा संपली आहे. आता हा चित्रपट प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थिगती दिली आहे.

Jhund
‘Jhund’ निर्मार्त्याचा प्रश्न ‘The Kashmir Files’ कर मुक्त का?

'झुंड' हा चित्रपट OTT फ्लॅटफॉर्मवर उद्या म्हणजेच 6 मेला प्रदर्शित होणार आहे. 'झुंड' (Jhund) चित्रपटाच्या निर्मात्यांवर कॉपीराइटचा आरोप होता. त्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने 'झुंड' या चित्रपटाला ६ मेला OTT वर प्रदर्शित करण्यास बंदी घातली. यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात चित्रपटाच्या निर्मात्यांनी अर्ज दाखल केला. आता त्यावर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत ​​चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

आता अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ चित्रपटाच्या ओटीटी रिलीजला हिरवी झेंडा मिळाला असून आता हा चित्रपट उद्या ६ मे रोजी OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित ‘झुंड’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी केले आहे. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर आकाश ठोसर (Akash Thosar) आणि रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) हे या चित्रपटात दिसले आहेत.

Jhund
Jhund Teaser : गल्लीतली पोरं अन् अमिताभ…, नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा टीझर प्रदर्शित
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com