‘फास्ट अँड फ्युरियस’चा फेम विन डिझेलवर लैंगिक अत्याचाराचे आरोप; काय आहे प्रकरण?
फास्ट अँड फ्युरिअस फेम आणि प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता विन डिझेलवर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. एका माजी सहाय्यक महिलाने हे आरोप केले आहेत. 2010 मध्ये 'फास्ट फाइव्ह' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विनने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने खटल्यात केला आहे. याप्रकरणी लॉस एंजेलिस न्यायालयात विन डिझेलच्या विरोधात खटलाही दाखल करण्यात आला आहे.
अस्टा जोनासन हिने विन डिझेलवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. एका हॉटेलच्या खोलीत ही जोडी ‘फास्ट फाइव्ह’ चित्रपटावर काम करत असताना ही घटना घडली असल्याचे तिने सांगितले. स्टारच्या कंपनीने कामावर घेतल्यानंतर सप्टेंबर २०१० मध्ये 'फास्ट फाइव्ह'च्या शूटिंगसाठी टीम अटलांटा गेली. यावेळी विन डिझेलने तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. अस्टाने याला स्पष्टपणे नकार दिली. परंतु, विन डिझेलने त्याकडे दुर्लक्ष करत लैंगिक अत्याचार केले.
काही तासानंतर कंपनीने तिला कामावरुन काढून टाकले. विन डिझेलच्या लैंगिक अत्याचाराला विरोध केल्यामुळेच ॲस्टा जॉनसनला कामावरून काढून टाकण्यात आले. विन डिझेलचे किळसवाणे हे कृत्य झाकण्यासाठीच हकलपट्टी केल्याचा आरोप तिने केला आहे.
दरम्यान, हॉलीवूडमधील अतिशय लोकप्रिय चित्रपटमध्ये फास्ट अँड फ्युरियस याचा समावेश होतो. आतापर्यंत या चित्रपटाचे दहा भाग प्रदर्शित झालेले आहेत. फास्ट अँड फ्युरियसच्या सातव्या भागामध्ये भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही काम केलेले आहे.