Satish Vajra
Satish VajraTeam Lokshahi

प्रसिद्ध अभिनेत्याची धारदार शस्त्राने हत्या, बहिणीच्या मृत्यूचा बदला...

सतीशच्या पत्नीने तीन महिन्यांपूर्वीच आत्महत्या केली होती.
Published by :
shweta walge
Published on

कन्नड (Kannada) चित्रपटसृष्टीतील अभिनेते सतीश वज्र (Satish Vajra) यांची हत्या करण्यात आली आहे. सतीश वज्र यांची मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला आहे. सतीश बेंगळुरूच्या आरआर नगरमध्ये राहत होता. सतीशच्या पत्नीने तीन महिन्यांपूर्वीच आत्महत्या केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी घडली आहे, सतीशच्या घरमालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. फ्लॅटमधून रक्त येत असल्याचे त्याने पाहिले होते.यानंतर घरात बसवलेले सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) पाहिले असता सतीश घरी परतताच दोन अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला केल्याचे दिसून आले.यादरम्यान धारदार विळ्याने त्यांची हत्या करण्यात आली. यानंतर सतीशचे मारेकरी तेथून पसार झाले.

Satish Vajra
kareena kapoor khan : मुलं झाल्यानंतर करिनाने घेतला 'हा' निर्णय

सतीश वज्र यांनी घरच्यांच्या विरोधात लग्न केले होते. दोन्ही कुटुंबात नेहमीच भांडणाची परिस्थिती निर्माण झाली होती.याच कारणामुळे तीन महिन्यांपूर्वी पत्नी आत्महत्या केली होती.वृत्तानुसार, सतीशच्या मेहुण्याने आपल्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याच्यावर हल्ला केल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सतीशचा मेहुणा आणि सासऱ्यांचा शोध घेत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com