श्रीकृष्णाचे पात्र साकारणारे 'हे' कलाकार माहित आहे का?
1. सर्वदमन डी बॅनर्जी
रामानंद सागर यांच्या प्रचंड गाजलेल्या 'कृष्णा' या मालिकेत सर्वदमन यांनी कृष्णाची भूमिका साकारली होती. कार्यक्रमाप्रमाणे सर्वदमन यांनाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.
2. नितीश भारद्वाज
नितीश भारद्वाज यांनी एकदा नाही तर दोनवेळा श्री कृष्णाची भूमिका साकारली आहे. एकदा १९८८ साली 'महाभारत' या मालिकेत आणि दुसऱ्यांदा २००३ मध्ये 'विष्णु पुराण'.
3. सौरभ राज जैन
'उतरन', 'चंद्रगुप्त मौर्य' यांसारख्या कार्यक्रमात भूमिका करणारा अभिनेता सौरभ राज जैन याने २०१३ साली आलेल्या 'महाभारत' या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारली होती. आजही सौरभ या भूमिकेसाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.
4. विशाल करवाल
'द्वारकाधीश- भगवान श्री कृष्ण', 'नागार्जुन- एक योद्धा' आणि 'परमावतार श्री कृष्ण' या मालिकांमध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता विशाल करवाल देखील प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता.
5. सुमेध मुदगलकर
मराठी अभिनेता सुमेध मुदगलकर 'राधाकृष्ण' मालिकेत साकारलेल्या कृष्णाच्या भूमिकेसाठी प्रचंड लोकप्रिय आहे. सुमेधच्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांना कृष्णाचं वेड लावलं.
6. स्वप्नील जोशी
टिव्हीवरचा ‘कृष्ण’ म्हटलं की अजुनही सगळ्यांच्या डोळ्यासमोर येणारा गोंडस मराठी चेहरा म्हणजे स्वप्नील जोशी. त्याने १९९३ मधील 'कृष्णा' मालिकेत भूमिका साकारली असून त्याच्या या भूमिकेसाठी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते.
8. अक्षय कुमार
2012 मध्ये रिलीज झालेल्या 'OMG : Oh My God' मध्ये अक्षय कुमारने साकारलेली भगवान कृष्णाची भूमिका लक्षवेधी ठरली होती. 2015 साली 'OMG: Oh My God'चा तेलगूमध्ये ‘गोपाला गोपाला' म्हणून रिमेक करण्यात आला ज्यात पवन कल्याण कृष्णाच्या भूमिकेत होते.
9. एनटीआर
दिवंगत अभिनेते- राजकारणी एनटी रामाराव... जे एनटीआर म्हणून ओळखले जातात; त्यांनी श्री कृष्णार्जुन युद्धम', 'कर्णन', 'दाना वीरा सूरा कर्ण' आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती.