Dilip kumar | दिलीप कुमार यांचे गाजलेले चित्रपट

Dilip kumar | दिलीप कुमार यांचे गाजलेले चित्रपट

Published by :
Published on

दिग्गज अभिनेते दिलीप कुमार याचं आज (७ जुलै) निधन झालं. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांनी त्यांच्या कारकीर्दीत ६० सिनेमे केले. त्यांच्या प्रत्येक सिनेमाने बॉलिवूडमध्ये वेगळी छाप सोडली.

'मुगल-ए-आझम' या चित्रपटाचं नाव सिनेसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरलं गेलं. तब्बल १४ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर के. आसिफ यांनी हा चित्रपट तयार केला होता. विशेष म्हणजे हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला… इतकंच काय तर आजही प्रेक्षकांच्या मनावर हा चित्रपट राज्य करत असल्याचं पाहायला मिळतं.

'दाग' (१९५२) – फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब मिळवणारे दिलीप कुमार पहिले कलाकार होते.

'नया दौर' (१९५७) – 'नया दौर' मध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचे सामर्थ्य आहे. दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या नया दौर हा सर्वकालीन क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो.

'गंगा-जमुना' (१९६१) – या सिनेमात दिलीप कुमार एका अल्लड गावकऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांना बघायला मिळाले. या चित्रपटात ते भोजपुरी बोलताना दिसले.

राम और श्याम' (१९६७) – दिलीप कुमार, वहिदा रहमान आणि मुमताज यांच्या भूमिका असलेला 'राम और श्याम' हाही त्या काळातील क्लासिक सिनेमा ठरला. या चित्रपटात दिलीप कुमार यांनी दुहेरी भूमिका साकारली होती.

'देवदास' (१९५५) – दिलीप कुमार यांच्या 'देवदास' चित्रपटाने अभिनेत्री वैजयंती माला यांना चित्रपट सृष्टीत खरी ओळख मिळवून दिली.

शक्ती' (१९८२) – शक्ती सिनेमाही दिलीप कुमार यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा सिनेमा आहे. या चित्रपटातील 'जो लोग सच्चाई की तरफदारी की कसम खाते हैं… जिंदगी उनके बड़े कठिन इम्तिहान लेती है,' हा डॉयलॉग खूप गाजला.

या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका इतक्या गाजल्या की, आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. दिलीप कुमार यांच्या कार्याला लोकशाहीचा सलाम

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com