“दिलीप कुमार यांनी अभिनयाशिवाय हिंदी सिनेसृष्टीसाठी योगदान दिलं नाही”- नसीरुद्दीन शाह
नुकतेच हिंदी सिनेष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला. त्याचप्रमाणे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी देखील दिलीप कुमार यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं होतं. मात्र असं असलं तरी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिलीप कुमार यांच्या योगदानाबद्दल नसीरुद्दीन शाह याचं मत वेगळं असून त्यांनी स्पष्टपणे त्यांचं मत मांडलं आहे.
एका वृत्तपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये नसीरुद्दीन यांनी खळबळजनक सवाल उपस्थित केले आहेत. "दिलीप कुमार यांनी एक दिग्गज कलाकार असूनही हिंदी सिनेमा किंवा नवोदितांना पुढे जाण्यासाठी खास योगदान दिलेलं नाही.त्याच प्रमाणे दिलीप कुमार यांनी अभिनयात नाट्यमय अभिनय, कडक आवाज आणि सतत हातवारे करणं या मापदंडांचं पालन केलं नाही. दिलीप कुमार यांनी त्यांची एक स्टाइल तयार केली. त्यांच्या या शैलीचं त्यानंतर आलेल्या अनेक कलाकारांनी अनुकरण करण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्यांना फारसं जमलं नाही" असं नसीरुद्दीन यांनी या लेखात म्हंटलं आहे.
दिलीप कुमार हे देशातील सर्वात महान व्यक्तींपैकी एक होते. केवळ त्यांच्या सहभागामुळेच सिनेमा लोकप्रिय ठरत होते. एवढी प्रसिद्धी आणि लोकप्रियता असतानाही त्यांनी खास असं काही केलं नाही असं नसीरुद्दीन आपल्या लेखात म्हणाले आहेत.