दिग्पाल लांजेकरने उचलले ‘शेर शिवराज है’ चे शिवधनुष्य

दिग्पाल लांजेकरने उचलले ‘शेर शिवराज है’ चे शिवधनुष्य

Published by :
Published on

दिग्दर्शनाकडे वळल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील वेगवेगळे टप्पे चित्रपटरूपाने जनतेसमोर आणणारा लेखक – दिग्दर्शक – अभिनेता दिग्पाल लांजेकर आता शिवचरित्रातील एक नवा अध्याय उलगडण्यासाठी सज्ज झाला आहे. दिग्पालच्या याच सिनेमाचे शीर्षक 'शेर शिवराज है' असे आहे.
 
'शिवराज अष्टक' ही आठ चित्रपटांची मालिका दिग्पाल सादर करणार आहे. यातील 'शेर शिवराज है' हा सिनेमा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याच कारणामुळे दिग्पाल सध्या या सिनेमाची जोरदार तयारी करत आहे. आठ चित्रपटांपैकी 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या दोन चित्रपटांचे दिग्पाल आणि त्याच्या टीमने उत्तम सादरीकरण केले आहे. 'जंगजौहर' हा तिसरा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या सिनेमाबाबत सर्वांनाच खूप कुतूहल आणि उत्सुकता आहे. ही गोष्ट नक्कीच उत्साह वाढवणारी असल्याचे दिग्पालचे मत आहे.


'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या 'जंगजौहर' या सिनेमांमुळे रसिकांच्या दिग्पालकडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत. याच अपेक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने दिग्पाल 'शेर शिवराज है' या चित्रपटासाठी खूप अभ्यास करत आहे. अफझलखानाचा वध हा केवळ शत्रूचा वध नव्हता, तर शिवाजी महाराजांनी त्यात उत्तम युद्धतंत्र आणि मानसिक दबावतंत्राचा अंतर्भाव केला होता. दिग्पालने आपल्या सिनेमांमधून शिवाजी महाराजांची वेगवेगळी रूपे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 'फर्जंद' या सिनेमात शिवराय मार्गदर्शकाच्या रूपात होते तर 'फत्तेशिकस्त'मध्ये स्वत: मैदानात उतरून नेतृत्व करताना रणनीतीज्ञाच्या भूमिकेत दिसले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com