'धर्मवीर 2' चित्रपटाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यात शुभारंभ

शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात गाजला.

मुंबई : शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात गाजला. या चित्रपटानंतर आता धर्मवीर दोन मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होत आहे.

तसेच, धर्मवीर दोन मधील सर्वच कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. ठाण्यातील कोळशेद रोड येथे असणाऱ्या स्टुडिओमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाचा सेट हुबेहूबरित्या उभारला असून आनंद आश्रम येथील सर्वच वास्तू या सेटवरती ठेवण्यात आलेल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com