‘डार्लिंग’येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘डार्लिंग’येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Published by :
Published on

मागील वर्षाभरापासुन कोरोनामुळे प्रतिक्षेत असलेल्या चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा घोषित केल्या जात आहे.तसेच चित्रपटगृहांचे दरवाजे देखील उघडणार आहेत म्हणून चित्रपट प्रदर्शित करण्याची लगबर सुरू झाली आहे. त्यातच अभिनेते प्रथमेश परब अभिनीत 'डार्लिंग'ला अखेर प्रदर्शनाची निश्चित तारीख मिळाली आहे. हा चित्रपट याच वर्षी १० डिसेंबरला चित्रपटगृहातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'डार्लिंग'हा चित्रपट घोषणेपासुनच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. समीर आशा पाटील यांनी 'डार्लिंग'चं दिग्दर्शन केलं आहे. समीर यांनी आजवर नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळे विषय हाताळत दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे अर्थातच 'डार्लिंग'कडून सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. या चित्रपटाची निर्मिती ७ हॉर्स एन्टरटेन्मेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्स च्या बॅनरअंतर्गत निर्माते अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही. जे. शलाका आणि निखिल खजिनदार यांनी केले आहे.

प्रत्येक क्षणाला काहीतरी ट्विस्ट हे या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे.या चित्रपटात प्रथमेश परब नायक म्हणून आहेत. तर या चित्रपटात प्रथमेशची 'टकाटक' चित्रपटातील जोडीदार रितिका श्रोत्रीच पुन्हा एकदा त्याची नायिका म्हणून झळकणार आहे. या निमित्ताने प्रथमेश-रितिका ही जोडी पुन्हा एकदा रसिकांसमोर येणार आहे. 'लागीरं झालं जी' आणि 'कारभारी लयभारी' फेम निखिल चव्हाणचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच 'डार्लिंग'चं लेखनही समीर आशा पाटील यांनी केलं आहे. या सिनेमात प्रथमेश-रितिका-निखिल यांच्या जोडीला मंगेश कदम, आनंद इंगळे आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीतकार चिनार-महेश या संगीतकार जोडीनं या चित्रपटाला संगीत दीले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com