‘रजनी अण्णा’ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

‘रजनी अण्णा’ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Published by :
Published on

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके या चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये या बातमीमुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आज महान नायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे, असं पुरस्काराची घोषणा करताना जावडेकर यांनी सांगितलं.

चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत 'बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन'मध्ये 'कंडक्टर' म्हणून कामाला होते. आपल्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात करण्यापूर्वी रजनीकांत त्यांच्या घराजवळ असलेल्या रामा हनुमान मंदिरात स्टंट्सची प्रॅक्टिस करत असत. रजनीकांत असे एकमेव अभिनेते आहेत ज्यांचा सीबीएसई अभ्यासक्रमात उल्लेख केला गेला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com