“पडदा उघडण्याबाबत योग्यवेळी निर्णय घेऊ”-अमित देशमुख;रंगकर्मींच्या पदरी निराशाच.
आर्थिक संकटात सापडलेल्या रंगकर्मी आणि रंगमंचावरील कामगारांच्या वेदना सरकारला कळण्यासाठी 'रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र' यांच्या वतीने क्रांतीदिनानिमित्त महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते.त्याची दखल घेऊन सांस्कृतिक मंत्र्यांनी रंगकर्मीना भेटण्याचे आश्वासन दिले होते. आता ही बैठक संपली असून सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखांनी आता निर्णय दिला आहे.बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली.वृध्द कलाकारांच पेन्शन ,असंघटीत कलाकारांना एकत्र येऊन संघटना करण्याची मागणी,अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
"मनोरंजन विश्व सुरळीत व्हावं अशी शासनाची सुद्धा इच्छा आहे.कलाकारांच्या काही मागण्या रास्त आहेत. टास्कफोर्स आणि आपत्ती व्यवस्थापनशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ.कोरोनाचा संसर्ग वाढल्यास पुन्हा निर्बंध लावावे लागतील.त्यामुळे मनोरंजन क्षेत्रासाठी योग्यवेळी निर्णय घेऊ". असं देशमुखांनी बैठ्कीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं."कलाकारांना मदत करण्याची सरकारला कल्पना आहे".असे देशमुखांनी सांगितले.
आजच्या या बैठकीत काहीतरी सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा रंगकर्मीना होती. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली.आता यानिर्णयानंतर रंगकर्मी काय भूमिका घेतील आणि रंगकर्मींच्या नाट्यआंदोलनाला वेगळे वळण मिळते की? काय याकडे साऱ्यांच लक्ष लागून आहे.