चिपळूणच्या 'दस्तुर' नामक मराठी शॉर्ट फिल्मला 3 नॅशनल अवॉर्ड

चिपळूणच्या 'दस्तुर' नामक मराठी शॉर्ट फिल्मला 3 नॅशनल अवॉर्ड

इंडियन फिल्म हाऊस प्रस्तुत नॅशनल लेवल शॉर्ट फिल्म अवॉर्ड सीझन 2 या वर्षी बंगलोर येथे भरवण्यात आला होता.
Published by :
Team Lokshahi
Published on

निसार शेख | चिपळूण | इंडियन फिल्म हाऊस प्रस्तुत नॅशनल लेवल शॉर्ट फिल्म अवॉर्ड सीझन 2 या वर्षी बंगलोर येथे भरवण्यात आला होता. या स्पर्धेकरिता भारताच्या विविध भागातून दर्जेदार आणि अव्वल लघुपट आले होते. हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा सर्व प्रकारच्या भाषांमधून मिळून एकूण 80 लघुपट होते. त्यातून आपल्या रत्नागिरीच्या "TRADS PRODUCTION" ची "दस्तुर" नामक मराठी शॉर्ट फिल्म 3 national Award पटकावून यशस्वी ठरली. त्यामध्ये चिपळूण तालुक्यातील मुंढे गावची सुकन्या तन्वी सुरेंद्र खेतले हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तृतीय तर सर्वोत्कृष्ट आयुष मोहिते छायांकन तृतीय आणि श्रीपाद गांधी तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम देवव्रत पवार यांनी पटकावले. त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com