'आयसी 814 : द कंदहार हायजॅक' वेबसीरिजमध्ये बदल; मालिका दाखवण्यासाठी सरकारने ठेवली 'ही' अट
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या वादग्रस्त वेबसिरीज 'आयसी 814 : द कंदहार हायजॅक' मधील आक्षेपार्ह मजकुराच्या संदर्भात नेटफ्लिक्स इंडियाच्या सामग्री प्रमुख मोनिका शेरगिल मंगळवारी सकाळी माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांच्यासमोर हजर झाल्या. कार्यालयात झालेल्या 40 मिनिटांच्या बैठकीत चॅनलच्या अधिकाऱ्यांना अशा संवेदनशील मुद्द्यांवर देशातील जनतेच्या भावनांशी खेळता येणार नसल्याचे सांगण्यात आले.
केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी नेटफ्लिक्सच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सामग्रीमध्ये भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचा आदर केला पाहिजे. केंद्र सरकारने अमेरिकन मीडिया कंपनी नेटफ्लिक्सच्या कंटेंट हेडला बोलावल्यानंतर मंगळवारी शास्त्री भवनात ही बैठक झाली.
तुम्ही काहीही चुकीचे दाखवण्यापूर्वी विचार करा. सरकार हा विषय अतिशय गांभीर्याने घेत आहे. दहशतवाद्यांची प्रतिमा वाढवण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. परदेशी लोकांना आपल्या सांस्कृतिक मूल्यांबद्दल काही वाईट बोलण्याची परवानगी द्यावी का? त्यामुळे, नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट हेड मोनिका शेरगिल यांनी सांगितले की, 1999 च्या वास्तविक घटनेवर आधारित या मालिकेमध्ये आता एक ओपनिंग डिस्क्लेमर असेल.
या मालिकेत दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना भोला आणि शंकर या हिंदू नावांनी संबोधण्यात आले होते. आता त्यांची खरी मुस्लिम नावे चित्रपटाच्या कायदेशीर संदेशात देण्यात येणार आहेत. या वेबसिरीजवर बंदी घालण्यासाठी हिंदू सेनेचे हिंदू संघटनेचे प्रमुख सुरजित सिंह यादव यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.