BombayHighCourt | अभिनेत्री कंगना राणौतची मानहानी खटल्या प्रकरणी याचिका मंजूर ….
गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या मानहानीच्या खटल्या प्रकरणात बॉम्बे हायकोर्टने अभिनेत्री कंगना राणौतची (kangna ranaut) याचिका ऐकण्यास सहमती दिली आहे. त्यामुळे कंगनाकडे हि शेवटची संधी असल्याचा प्रश्न नेटकर्यांना पडला आहे.
बॉलीवूडमधील ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (JAVED AKHTAR) यांची बदनामी केलेल्या आरोपांची दखल घेण्यात आली होती. अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आपल्याविरुद्ध सुरू केलेली फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कार्यवाही रद्द करून घेण्यासाठी कंगनाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.
जावेद अख्तर यांनी घरी बोलावले आणि ऋतिक रोशन प्रकरणात माफी मागण्याचा सल्ला दिला. हे सांगताना ते वरच्या आवाजात बोलत होते. त्यामुळे मी घाबरले होते, अशा प्रकारचे विधान कंगना राणावत हिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. तिची बहीण रंगोली हिनेही त्यास दुजोरा दिला होता. याबाबत सोशल मीडियातही पोस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. कंगनाचा हा आरोप फेटाळत जावेद अख्तर यांनी कोर्टाचे दार ठोठावले आहे. कंगनाने केलेला आरोप तथ्यहीन असून यातून माझी नाहक बदनामी झाली आहे, असे नमूद करत जावेद अख्तर यांनी कंगनाविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे.
न्यायदंडाधिकाऱ्यांनी कायदेशीर तरतुदीचे पालनच केलेले नसल्याने ही कार्यवाही बेकायदा आहे, असा दावा करत कंगनाने केलेला अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे कंगनाने हायकोर्टात अर्ज सादर केला. संपूर्ण कायदेशीर कार्यवाही बेकायदा असल्याने ती रद्द करावी किंवा अंतिम निर्णय होईपर्यंत त्यास स्थगिती द्यावी, अशी विनंती अर्जात करण्यात आली होती . कंगनाने अॅड. रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत हा अर्ज सादर केला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांनी याप्रकरणी जुहू पोलिसांना दिलेले चौकशीचे आदेश, पोलिसांनी नोंदवलेली उत्तर या संपूर्ण प्रक्रियेवरही कंगनाने आपले आक्षेप अर्जात नोंदवला होता.