'Chandrayaan 3' मोहीम पूर्णत्वास येण्याचा क्षण; बॉलिवूड सेलिब्रिटींनी 'ISRO'ला दिल्या शुभेच्छा

'Chandrayaan 3' मोहीम पूर्णत्वास येण्याचा क्षण; बॉलिवूड सेलिब्रिटींनी 'ISRO'ला दिल्या शुभेच्छा

भारताची चांद्रयान मोहीम अंतिम टप्प्यावर आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भारताची चांद्रयान मोहीम अंतिम टप्प्यावर आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यास सज्ज आहे. आज संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चांद्रयानाबाबत इस्त्रोने ट्वीट करत माहिती दिलीय. चांद्रयान- ३’ चंद्रावर उतरविण्याच्या प्रक्रियेत 15 मिनिटे गुंतागुंतीची असतील, असे ‘इस्रो’च्या अधिकाऱ्यांसह अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. ही सर्व प्रक्रिया स्वयंचलित आहे. जेव्हा लँडर त्याचे इंजिन योग्य वेळी आणि योग्य उंचीवर सुरू करते तेव्हा योग्य प्रमाणात इंधन वापर केला जातो. इस्रो’चे संकेतस्थळ, युट्यूब वाहिनी, फेसबुक पेजवर थेट प्रक्षेपण दाखविले जाणार असल्याचे ‘इस्रो’ने सांगितले. संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांपासून हे थेट प्रक्षेपण सुरु होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही 'इस्रो'ला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे की, "चंद्रावर भारताचं पहिलं पाऊल पडणार... भारत इतिहास रचणार".

'चांद्रयान -3' मोहिमेत सहभागी असलेल्या प्रत्येक शास्त्रज्ञाच्या मेहनतीवर आमचा विश्वास आहे.यशस्वी व्हावं यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रत्येक भारतीय नागरिकाप्रमाणे 'चांद्रयान-3'या प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येकाबद्दल खूप अभिमान वाटतो आहे. असे अभिनेते मनोज जोशी म्हणाले.

आपल्याला अभिमान वाटावा असा हा क्षण असणार आहे. प्रत्येक भारतीय सध्या 'चांद्रयान-3' लॅण्डिंगच्या प्रतीक्षेत आहे. हा क्षण मी माझ्या मुलांसोबत अनुभवणार आहे. असे अभिनेत्री करीना कपूर म्हणाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com