बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताची राजकारणात एन्ट्री!
सोमवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर अभिनेत्री ईशा गुप्ता नवीन संसद भवनात पोहोचली. जिथे तिने निवडणूक लढवण्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. अनेक शानदार बॉलिवूड चित्रपट आणि 'आश्रम 2' सारख्या वेब सीरिजमध्ये आपला हॉटनेस तडका लावणारी अभिनेत्री ईशा गुप्ता नुकतीच नवीन संसद भवनात पोहोचली होती.
ईशा गुप्ताने महिला आरक्षण विधेयकाला मिळालेल्या मंजुरीवरही भाष्य केलं. अभिनेत्री म्हणाली, पीएम मोदींनी केलेलं हे खूप सुंदर काम आहे, जे आपल्या देशासाठी एक मोठं पाऊल आहे. या विधेयकामुळे महिलांमध्ये नवा उत्साह भरेल आणि त्यांना समान अधिकारही मिळतील, असंही ईशा म्हणाली.
दरम्यान, जेव्हा अभिनेत्रीला ती निवडणूक लढवणार आहे का? असं विचारण्यात आलं तेव्हा अभिनेत्री हसत हसत म्हणाली, "नक्कीच, नक्कीच... होय, मी नक्कीच निवडणूक लढवणार आहे." आता हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल की, ती कधी आणि कुठून निवडणूक लढवते.
दरम्यान, महिला आरक्षणाचं विधेक मंजूर झाल्यावर नवीन संसदेत कंगना रणौतनेही पोहचली होती. ती म्हणाली, 'हे सर्व पंतप्रधान मोदींमुळे शक्य झालं आहे. हा देश आणि देशातील महिलांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. नवीन संसदेचं हे पहिलंच अधिवेशन होतं आणि संपूर्ण अधिवेशन हे महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या प्रगतीसाठी समर्पित होतं.'