Bigg Boss Marathi 5: "गावच्या मातीतील 'या' तिघांना माझं प्रेम आणि सपोर्ट रहाणार..." नक्की काय म्हणाले किरण माने? जाणून घ्या...

Bigg Boss Marathi 5: "गावच्या मातीतील 'या' तिघांना माझं प्रेम आणि सपोर्ट रहाणार..." नक्की काय म्हणाले किरण माने? जाणून घ्या...

बिग बॉस मराठी 5 सिजनची चर्चा सुरु असताना बिग बॉस सिजन 4 मधील स्पर्धक किरण माने यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी बिग बॉस मराठी 5 च्या काही स्पर्धकांविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

बिग बॉस मराठी 5 सिजनची चर्चा सर्वत्र सुरु आहे, गेल्या आठवड्यापासून सुरु झालेल्या बिग बॉस मराठी 5 मध्ये भांड्याला भांड लागायला देखील सुरुवात झालेली आहे. बिग बॉस मराठी 5 सिजनमध्ये नुकतचं गाजलेलं भांडण हे निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच होत ज्यात निक्की तांबोळीने वर्षा उसगांवकर यांची अक्कल देखील काढली होती, यादरम्यान या दोघींचे हे भांडण चर्चेचा विषय ठरला होता. तर या भांडणामुळे निक्की तांबोळीला सोशल मीडिया यूजर्सद्वारे ट्रोल देखील करण्यात आलं. तसेच पुष्कर जोग याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती ज्यात 'निक्की तांबोळीला मोठ्यांशी कसं वागायचं ते कळतं नाही' हे नमूद केलं होत. यावेळी बिग बॉस मराठी 5 च्या स्पर्धकांची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे, तसेच या स्पर्धकांना प्रेक्षकांकडून ही प्रेम मिळत आहे.

बिग बॉस मराठी 5 सिजनची चर्चा सुरु असताना बिग बॉस सिजन 4 मधील स्पर्धक किरण माने यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी बिग बॉस मराठी 5 च्या काही स्पर्धकांविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे. हे तीन स्पर्धक म्हणजे सूरज, धनंजय आणि घन:श्याम यांच्यासाठी ते पोस्टमध्ये ते म्हणाले, "हे तिघे कसेही खेळले जरी यांनी मुर्खपणा केला तरी माझा सपोर्ट या तिघांना रहाणार आहे. हे तिघ गावच्या मातीतली असल्यामुळे हे रिअल वागून लोकप्रिय होऊन इथवर पोहोचलेले आहेत आणि बिग बॉसमध्ये ते जे काहीही कसेही वागतील ते 'रिअल' असणार आहे".

यापुढे ते म्हणाले, "या सगळ्यांविषयी मला आदर आहे आणि त्यांना ही माझ्याविषयी आदर आहे. ते ज्या पद्धतीचे रील्स बनवतात, ते मला कधीच जमणार नाही. खोटं वागणार्‍या आणि माकडचाळे करणार्‍यांचं बिग बॉसमध्ये माकड होतं". यादरम्यान त्यांनी बिग बॉसमधील त्यांचा देखील अनुभव शेअर केला ते म्हणाले, पुर्वी मी बिग बॉसच्या सिझन दोनची ऑफर नाकारली होती. त्यानंतर मी सिझन चार स्विकारला कारण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. याचबरोबर बिग बॉस माझ्यासाठी गॉडफादर ठरलं. इथं माकड केलं जात नाही, बिगबॉस वाघाला वाघ म्हणूनच दाखवतो आणि माकडाला माकड" असं म्हणतं किरण माने यांनी आपले मत या पोस्टद्वारे व्यक्त केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com