'टीडीएम'ला थिएटर मिळेना; भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, त्या दिवशी मी सिनेमा करण्याचं बंद करेन...
भाऊराव कऱ्हाडे यांचा चा 'टीडीएम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र या चित्रपटाला स्क्रीन मिळत नाही आहे. आजवर मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळींनी स्क्रीन मिळण्याच्या विषयावर बोलले आहेत.
या चित्रपटाला थिएटलमध्ये स्क्रीन मिळत नसल्यानं या चित्रपटाच्या टीमला अश्रू अनावर झाले. टीडीएम' हा सिनेमा प्रेक्षकांना आवडत आहे आणि सिनेप्रेमी हा सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहे. मात्र सिनेमागृहात शो नसल्या कारणाने मराठी प्रेक्षकांवर आणि कलाकारांवर अन्याय होत आहे. मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता यापुढे सिनेमा करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही. असे भाऊराव कऱ्हाडे म्हणाले.
माझा सिनेमा आवडला नसेल तर लोकांनी तसं स्पष्ट सांगावं. तुझा सिनेमा चांगला नाही, तू लायक नाहीस. त्या दिवशी मी सिनेमा करण्याचं बंद करेन. पिंपरी चिंडवडमध्ये या सिनेमाचे दोन शो होते. सिनेमागृह तुडुंब भरलेलं असतानाही शो वाढवून दिला नाही. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना शो रद्द करणं कितपत योग्य आहे. असे भाऊराव कऱ्हाडे म्हणाले.