मनोरंजन
प्रसिद्ध युट्युबर भुवन बामच्या आई-वडिलांचे कोरोनाने निधन
प्रसिद्ध युट्युबर आणि कॉमेडीयन भुवन बामच्या आई-वडिलांचे कोरोनाने निधन झाल्याची घटना घडली आहे. सोशल मिडीयावर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिली आहे.
मी आपल्या दोन्ही लाईफलाईनला कोरोना महामारीत गमावले आहे. आई -बाबा गेल्याने आयुष्यात पहिल्या सारख काहीच नसणार आहे. एका महिन्यात सर्व काही विखुरल गेले आहे. आई, बाबा माझ्यासोबत नाही आहेत, त्यामुळे आता सुरुवातीपासून जागायला शिकाव लागेल. मन नाही करत आहे, अशा भावना मांडत त्याने मन मोकळ केले.
मी खरचं एक चांगला मुलगा आहे का ? मी त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत का ? हे सर्व प्रश्न आता माझ्या सोबत आयुष्यभर राहतील, मी त्यांना पुन्हा पाहण्यासठी थांबवूही शकत नाही, ते दिवस पुन्हा यावेत, अशी भावनिक पोस्ट त्याने केली आहे.