'अवतार’ आता लवकरचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर
हॉलिवूडचा बहुचर्चित ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स कॅमरुन यांनी केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'अवतार : द वे ऑफ वॉटर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाकूळ घातला आहे. आता सिनेप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. 'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट सिनेप्रेमींना घरबसल्या पाहता येणार आहे. म्हणजेच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याची शक्यता आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून चाहत्यांची उत्सुकता वाटली आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत 454 कोटींची कमाई केली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney + Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार असल्याची शक्यता आहे. कारण कोणत्याही चित्रपटात प्रदर्शित होऊन 45 दिवस पूर्ण झाले की तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येतो. पण अद्याप 'अवतार 2'च्या निर्मात्यांकडून यासंबंधीत कोणीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
'अवतार 2' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट रिलीजच्या चौथ्या आठवड्यातही करोडोंची कमाई करत आहे. 'अवतार : द वे ऑफ वॉटर' या चित्रपटाचा पहिला भाग 'अवतार' 2009 मध्ये प्रजर्शित झाला होता. तर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागालाही सिनेप्रेंमीचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.