Avatar 2 : निर्मात्यांना मोठा झटका, रिलीज होण्यापूर्वीच अवतार-2 भारतात ऑनलाईन लीक
बहुप्रतिक्षित चित्रपट 'अवतार: द वे ऑफ वॉटर' जगभरात रिलीज होण्यापूर्वीच लीक झाला आहे. जेम्स कॅमेरॉनचा हा चित्रपट आज 16 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट अनेक वेबसाइट्सवर मोफत डाऊनलोड केला जात आहे. हा या चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी मोठा धक्का आहे. यामुळे निर्मात्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
जेम्स कॅमेरॉनचा पार्ट 2 चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपट समीक्षकांनी चित्रपटाची कथा, दृश्य, प्रभाव याबद्दल उत्कृष्ट रिव्यू दिली आहेत. $400 दशलक्ष बजेटचा चित्रपट 'अवतार: द वे ऑफ वॉटर' 1080P प्रिंटमध्ये मूव्ही स्ट्रीमिंग अॅप्स आणि प्रमुख टॉरेंट पोर्टलवर उपलब्ध आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याची बातमी धक्कादायक आहे. Tamilrockers, Movierulz, Filmyzilla, Telegram यांसारख्या अनेक ऑनलाइन टोरेंट साइटवर हा चित्रपट लीक झाला आहे.
'अवतार 2' ऑनलाइन लीक
या चित्रपटाची बरीच चर्चा होत असून बॉक्स ऑफिस कलेक्शनचा नवा विक्रम करण्याच्या तयारीत आहे. मात्र, ऑनलाइन गळतीमुळे त्यात खोडा बसण्याची शक्यता आहे. तेही जेव्हा तिकिटाचे दर खूप जास्त असतात. या चित्रपटाचे समीक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे. चित्रपटाचे प्री-बुकिंगही उत्तम झाले आहे. ऑनलाइन लीक असूनही, 'अवतार: द वे ऑफ वॉटर' चित्रपट जगभरात $ 500 दशलक्ष कमावण्याच्या जवळ आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाने 15 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
2022 च्या अखेरीस प्रदर्शित झालेला 'अवतार: द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट भारत आणि यूएसएमध्ये 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 2009 मध्ये रिलीज झाला होता आणि रिलीज होताच त्याने जगभरात खळबळ उडवून दिली होती. एकट्या 'अवतार'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई केली. आता सिक्वेलच्या बॉक्स ऑफिस रिपोर्टची प्रतीक्षा आहे.