Nitin Desai : 'लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार', नितीन देसाईंच्या ऑडिओ क्लिपमधील वाक्य

Nitin Desai : 'लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार', नितीन देसाईंच्या ऑडिओ क्लिपमधील वाक्य

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं. कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं आहे.देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे.

नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. स्टुडिओ सुरक्षा रक्षकाने पोलिसांनी माहिती दिली की, नितिन देसाई अनेकदा स्टुडिओत यायचे आणि रात्री उशीरा किंवा सकाळी जायचे ते आज बाहेर आले नाही म्हणुन सुरक्षा रक्षक पहायला गेला असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसले. सकाळी सुरक्षा रक्षकाने पोलिसांना फोन करुन माहिती दिली.

त्यांच्या काही ऑडिओ क्लिप्स समोर आल्याची माहिती मिळते आहे. व्हॉईस रेकॉर्डरमध्ये 11 ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्या आहेत. यात लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार असे म्हटल्याचे समजते. तसेच एन.डी.स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या ताब्यात जाऊ देऊ नका. असेही त्यांनी या ऑडिओ क्लिप्समध्ये म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हितीनुसार या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये नितीन देसाई यांनी रेकॉर्ड केलेल्या 11 ऑडिओ क्लिप असून त्याचा तपास पोलिस करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com