Karishma Kapoor
Karishma Kapoor Team Lokshahi

Karishma Kapoor : 'या' वयातच करिश्माने सोडलं तिचं शिक्षण

करिश्माला लहानपणापासूनच मोठी अभिनेत्री बनण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे तिचे अभ्यासाकडेही दुर्लक्ष झाले होते.
Published by :
Published on

बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीत आपल्या अप्रतिम अभिनयाने लोकांना वेड लावणाऱ्या करिश्मा कपूर (Karishma Kapoor) हिने एकापेक्षा एक चित्रपटात काम केलेलं आहे. करिश्मा अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी लहान वयातच चित्रपट सृष्टीत आपलं पाऊल ठेवलं. फिल्मी पार्श्वभूमी असलेल्या करिश्माला लहानपणापासूनच मोठी अभिनेत्री बनण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे तिचे अभ्यासाकडेही दुर्लक्ष झाले होते. तिचे लक्ष फक्त अभिनयावर होते. 25 जून म्हणजेच 1974 मध्ये या दिवशी जन्मलेली करिश्मा कपूर ही रणधीर कपूर आणि बबिता यांची मोठी मुलगी आहे. तिला नेहमीच माधुरी दीक्षित आणि श्रीदेवीसारखे बनायचे होते. याच कारणामुळे तिने लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Karishma Kapoor
करिश्मा कपूर पुन्हा लग्न करणार का?

तिने 1991 मध्ये 'प्रेम कैदी' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि यावेळी ती फक्त 16 वर्षांची होती. चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यासाठी करिश्माने अगदी सहावीत असतानाच तिचे शिक्षण सोडले. करिश्मा कपूरच्या एज्युकेशन बद्दल बोलायचे तर मीडिया रिपोर्ट्सनुसार ती फक्त 5वी पास आहे. मात्र चित्रपट कारकिर्दीत तिने खूप मोठं नाव कमावलेलं आहे. ती ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.

तिने तिच्या कारकिर्दीत जवळपास 60 चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. त्यापैकी बहुतांश चित्रपट हे हिट देखील ठरले आहेत. करिश्माच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये राजा बाबू, कुली नंबर 1, साजन चले ससुराल, हीरो नंबर 1, बीवी नंबर 1, दुल्हन हम ले जाएंगे, हम साथ-साथ हैं, दिल तो पागल है, जिगर आणि अनारी या चित्रपटांचा समावेश आहे. यानंतर तिने 2012 मध्ये 'डेंजरस इश्क'मधून पुनरागमन केलं होतं मात्र या चित्रपटाला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही.

Karishma Kapoor
Karisma Kapoor Bday : करिश्मा कपूर या अभिनेत्यांच्या प्रेमात पडली, तरीही खरे प्रेम मिळाले नाही
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com