आर्यनला सोडण्याची प्रक्रिया सुरु; जामीन पत्र पेटी उघडून रिलीज ऑर्डर नेण्यात आली
कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अखेर अभिनेत शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला असून आर्यन याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांनाही न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी जामीन मंजूर केला असून तिघांनाही हायकोर्टाने विशेष अटी घातल्या आहेत. दरम्यान, जामीनासाठी लागणारे कागदपत्रे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जेल प्रशासनाच्या पत्रपेटीत पोहोचणं अपेक्षित होतं, पण ते शक्य झालं नाही. त्यामुळे आर्यनचा जेलमधील मुक्काम एका रात्रीने वाढला. त्यानंतर आज आर्यनला अखेर आर्यनला सोडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
सकाळी ५.३० वाजता जामीन पत्र पेटी उघडून रिलीज ऑर्डर नेण्यात आली. काही वेळापूर्वी ऑर्डर जेलच्या आतमध्ये घेऊन गेल्यामुळे आर्यन खानची कोणत्याही क्षणी सुटका होणार आहे. आर्यनच्या स्वागतासाठी मन्नत सज्ज देखील झाले आहे.
आर्यन, अरबाज आणि मूनमून या तिघांचा जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर या तिघांनीही मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. तिघांच्याही जामीन अर्जांवर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. मंगळवार आणि बुधवारी ही सुनावणी अपूर्ण राहिली. त्यानंतर आज ही सुनावणी पूर्ण झाली. एनसीबीच्या वतीने अनिल सिंग यांनी आज युक्तिवाद केला. त्यानंतर आर्यनच्या वतीने मुकुल रोहतगी यांनीही म्हणणे मांडले. त्यानंतर कोर्टाने काही विशेष अटी घालत तिघांनाही जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तिघांना मोठा दिलासा मिळाला आहे. ३ ऑक्टोबर रोजी या तिघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रथम एनसीबी कोठडीत तर नंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.