मोठी अपडेट! धनुष्यबाण काढून नितीन देसाईंची आत्महत्या; 'त्या'चा अर्थ काय?
मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. त्यांच्या निधनावर सर्वच जणांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आता नवनवीन खुलासे होत आहे. अशातच, मोठी माहिती समोर येत आहे. नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्ये धनुष्यबाण प्रतिकृती तयार करून आत्महत्या केल्यांचे समजत आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
माहितीनुसार, नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. स्टुडिओ सुरक्षा रक्षकाने पोलिसांनी माहिती दिली की, नितिन देसाई अनेकदा स्टुडिओत यायचे आणि रात्री उशीरा किंवा सकाळी जायचे ते आज बाहेर आले नाही म्हणून सुरक्षा रक्षक पहायला गेला असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसले.
नितीन देसाई यांची आत्महत्या आर्थिक विवंचनेतून झाल्याचे समजते. नितीन देसाई यांनी एका कंपनीकडून तब्बल 180 कोटींच कर्ज घेतलं होतं. या कर्जाची पूर्तता करणे देसाई ते करू शकले नाहीत. 180 कोटी कर्जासाठी नितीन देसाई यांनी आपल्या काही जमिनी गहाण ठेवल्या होत्या, अशीही माहिती मिळत आहे. नितीन देसाईंनी आत्महत्येआधी ऑडिओ रेकॉर्ड करुन ठेवले आहेत. यामध्ये काही जणांची नावेही घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.
स्थानिक तरुणाच्या दाव्यानुसार, नितीन देसाई रात्रीच स्टुडिओतल्या 'मराठी पाऊल पडते पुढे'च्या सेटवर गेले होते. तसा निरोप त्यांनी स्थानिक केअरटेकर तरुणाला दिला होता. त्या सेटवर त्यांनी एक धनुष्यबाणाची प्रतिकृती काढली होती. सुतळीने फरशीवर धनुष्यबाण काढले त्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. या धनुष्यबाणाचा अर्थ काय, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
दरम्यान, बॉलिवूडच्या निर्माता दिग्दर्शकांनी एनडी स्टुडिओत शूटिंगवर अघोषित बहिष्कार घातल्याचा आरोप करण्यात आलाय. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी नितीन देसाई या अघोषित बहिष्काराबाबत बोलल्याचा दावा स्थानिक मनसे नेत्यानं केलाय.