अर्जुन कपूरने 'सिनेमा मरते दम तक'च्या निर्मात्यांचे मानले आभार
अमेझॉन प्राइम व्हिडिओने अलीकडेच आपली 'सिनेमा मरते दम तक' ही सिरीज रिलीज केली असून, या सिरीजने भारतीय सिनेमाच्या सुवर्णकाळातील चित्रपटांची स्पष्ट आणि खरी झलक दाखवून इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. अशातच, ही अमेझॉन ओरिजनल सिरीज 90 च्या दशकातील सिनेमात कोणी आणि काय योगदान दिले हे दर्शवते.
तसेच, या 6 भागांच्या इल डॉक्यू-सिरीजमध्ये प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरला गेस्ट होस्ट म्हणून पाहायला मिळत असून, त्या काळातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिलीप गुलाटी, जे नीलम, किशन शाह, आणि विनोद तलवार यांपासून त्याला प्रभावित होताना देखील पाहायला मिळते.
या डॉक्यु-सिरीजचा एक भाग असल्याबद्दल आपले विचार शेअर करताना अर्जुन कपूर म्हणाला, या सिरीजमध्ये मी कॅमिओ किंवा एक एक स्पेशल अपीयरेंसची व्यक्तिरेखा साकारली आहे. हे चित्रपट निर्माते मोकळेपणाने बोलू शकतील असे व्यासपीठ बनवायचे होते. एक क्षण जो त्यांना सेलिब्रेट करत होता अशा क्षणाचा एक भाग झाल्याचा मला आनंद झाला. प्राइम व्हिडीओने त्यांना एक व्यासपीठ दिले ज्याची थट्टा करण्याचा हेतू नव्हता. ते याला आटापिटा बनवण्याचा प्रयत्न न करता, त्या लोकांना हायलाइट करत आहेत ज्यांनी हा प्रवास केला आहे. जिथे ते त्यांच्या कथेची बाजू सांगू शकले अशा माहोलचा एक भाग बनून मला खूप आनंद झाला.
'सिनेमा मरते दम तक' आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर भारत आणि जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये स्ट्रीम होत आहे. तसेच, व्हाइस स्टुडिओ प्रोडक्शनची हि डॉक्यू-सिरीज वासन बाला यांनी तयार केली असून, याचे सह-दिग्दर्शन दिशा रिंदानी, झुल्फी आणि कुलिश कांत ठाकूर यांनी केले आहे.