अनुराग कश्यपच्या मुलीने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे प्रायव्हेट फोटोज

अनुराग कश्यपच्या मुलीने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे प्रायव्हेट फोटोज

Published by :
Published on

अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप ही सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अनेक स्टारकिड्स पैकी एक आहे. नुकतंच आलियाचा बॉयफ्रेंड शेन याने २४ ऑगस्ट रोजी आपला २२ वा वाढदिवस साजरा केला. सध्या ती अमेरिकी बॉयफ्रेंड शेन ग्रीगोइरे याला डेट करतेय. आलिया कश्यपने आपल्या खास अंदाज आपल्या बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बॉयफ्रेंडसोबतचे काही रोमॅण्टिक फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलिया बॉयफ्रेंडसोबत बरीच इंटीमेट होताना दिसून आली.

काही फोटोजमध्ये शेन आलियाला लिप लॉक करताना दिसून आला तर काही फोटोजमध्ये त्याने आलियाला उचलून घेतलंय. आलियाने शेअर केलेले हे बॉयफ्रेंडसोबतचे फोटोज खूपच बोल्ड आणि रोमॅण्टिक आहेत. शेन याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलियाने तिचे हे खाजगी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आलियाने शेअर केलेले फोटोज जितके रोमॅण्टिक आहेत, तितकीच रोमॅण्टिक त्यासोबतची कॅप्शन सुद्धा आहे. "माझ्या प्रेमाला 22 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…. ज्याने मला जगातील सर्वात भाग्यवान मुलगी ठरवलं…तू मला भेटलास हे मी माझं नशीब समजते….मी नेहमी तुझ्यावर प्रेम करत राहील.",असं लिहित तिने हे फोटोज शेअर केले आहेत. आलियाने लिहिलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. तिचे फॅन्स या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com