Anurag Kashyap
Anurag KashyapTeam Lokshahi

Anurag Kashyap : अनुरागणे निर्मात्यांबद्दल सांगितल्या काही महत्वाच्या गोष्टी...

अनुरागणे सांगितलं की बॉलिवूड इंडस्ट्रीत चित्रपट निर्मिती करताना काही गोष्टींची भीती असते...
Published by :
Published on

चित्रपट निर्माता अनुराग कश्यप(Anurag Kashyap) यांनी एका मुलाखतीदरम्यान बॉलीवूड बद्दल आणि दिग्दर्शकांच्या कामाच्या पद्धतीबद्दल सांगितलेलं आहे. तो म्हणाला की, बॉलिवूड इंडस्ट्रीत (Bollywood industry) चित्रपट निर्मिती करताना काही गोष्टींची भीती असते. त्याचबरोबर निर्मात्यांना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी प्रत्येक वेळी घ्यावी लागेल असेही ते म्हणाले. अनुराग म्हणतो की, मला मोठे चित्रपट आणि दीर्घ कथा सांगायला आवडतात. मी बर्‍याच गोष्टींवर काम करत राहतो परंतु बॉलीवूडचे वातावरण खूपच घट्ट आहे. इथं तुम्ही फक्त नाटकीय स्वरूप पाहू शकता. अनुराग म्हणाला पुढे म्हणाले की, सध्या आपण धार्मिक किंवा राजकारणाशी निगडित असे काहीही करू शकत नाही. कोणीतरी नकार दिला म्हणून नाही तर प्रत्येकजण एकाच वातावरणात राहतो म्हणून. त्यामुळे तुम्हाला माहीत नाही की यावर कोण प्रतिक्रिया देईल.

अनुराग पुढे म्हणाला की, आम्ही सध्या एका नाजूक टप्प्यावर आहोत जिथे आपण सहजपणे नाराज होतो आणि आपल्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे आजच्या काळात भारतातील निर्माते चित्रपट निर्मिती करताना वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करतात. त्याना लांबलचक कथानक बनवायला हवेत आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करायला हवं. परंतु त्याचबरोबर आपल्याला आपल्या सीमारेषेची देखील काळजी घ्यावी लागेल. \

Anurag Kashyap
Shahid Kapoor : मीरा अन शाहीदची तक्रार बनली चर्चेचा विषय....

अनुरागचा जन्म यूपीच्या गोरखपूर शहरात झाला. त्याने 1998 मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या 'सत्या' या क्राइम ड्रामा चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याला 'देव डी'मध्ये यश मिळाले. 2012 मध्ये त्याने 'गँग्स ऑफ वासेपूर' सारख्या चित्रपटाची निर्मिती करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनुरागचा हा चित्रपट त्याच्यासाठी फायदेशीर तर ठरलाच पण या चित्रपटाने अनेक चेहऱ्यांना नवी ओळखही दिली. त्यानंतर त्यांनी 'गुलाल', 'दॅट गर्ल इन यलो बूट्स', 'बॉम्बे वेल्वेट', 'रमन राघव 2.0', 'मुक्केबाज' यांसारखे अनेक चित्रपट केले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com