Anupam Kher
Anupam KherTeam Lokshahi

Emergency : अनुपम यांचा दमदार लुक पाहताच सुरू झालं चर्चेचं वादळ...

निर्मात्यांनी 'इमर्जन्सी' चित्रपटातील अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर केला आहे.
Published by :
Published on

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) लवकरच 'इमर्जन्सी' चित्रपटात दिसणार आहे. कंगनाचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट सतत चर्चेत असतो. दरम्यान निर्मात्यांनी 'इमर्जन्सी' चित्रपटातील अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर केला आहे. कंगनाच्या 'इमर्जन्सी'मध्ये अनुपम खेर एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. खरंतर अभिनेता अनुपम खेरने काही काळापूर्वी सोशल मीडियावर 'इमर्जन्सी' चित्रपटाचा पहिला लूक पोस्टर शेअर केला आहे. यासोबतच या अभिनेत्याने चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दलही खुलासा केला आहे. कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात अनुपम खेर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित राजकारणी जय प्रकाश नारायण (Jay Prakash Narayan) यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. म्हणजेच या चित्रपटात अनुपम खेर यांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Anupam Kher
Kangana Ranaut; आयटम सॉंगमध्ये काम न करण्याचं कारण...

अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर करताना जोरदार कॅप्शनही लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे की प्रश्नकर्त्याची भूमिका निर्भयपणे साकारताना मला खूप आनंद होत आहे आणि समाधान वाटत आहे. कंगना रानावत दिग्दर्शित 'इमर्जन्सी'मध्ये लोकनायक जेपी नारायण यांची भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे. 'इमर्जन्सी' या चित्रपटात कंगना राणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. अलीकडेच या चित्रपटातील त्याचे लूक पोस्टर देखील रिलीज करण्यात आले होते.

ज्यासाठी त्याला खूप प्रशंसा देखील मिळाली. 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या माध्यमातून देशातील सर्वात मोठी राजकीय घटना पडद्यावर आणली जाणार आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार 25 जून 1975 रोजी देशभरात आणीबाणी घोषित करण्यात आली होती. जयप्रकाश नारायण यांनी त्यावेळी इंदिरा गांधींच्या विरोधात देशव्यापी आंदोलन सुरू केले होते. ज्यामध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि इंदिरा गांधींच्या विरोधात आंदोलनात उतरले होते.

Anupam Kher
Anupam Kher : अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना KRK यांचा अनुपमवर निशाणा...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com