Ananya Pandey : 'या' चित्रपटाशी स्वतःची तुलना करते अनन्या....
अनन्या पांडे(Ananya Pandey)हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आणि सध्या तिच्याकडे अनेक मोठे चित्रपट देखील आहेत. अनन्याचा 'लिगर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी दाखवू शकला नाही. लवकरच अनन्या 'खो गये हम कहाँ' मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता अभिनेत्रीने तिच्या चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. पीटीआयशी बोलताना अनन्या म्हणाली की असं काही वेळा होतं जेव्हा तिने एखादा सीन वाचला आणि तिच्यासोबत असं घडल्याचं तिला जाणवतं. असं वाटतं की कोणीतरी तिचं आयुष्य कापत आहे. ती म्हणाली या चित्रपटात माझी स्वतःची भूमिका आहे असच मला वाटत आहे.
शिवाय अभिनेत्रीसाठी 'खो गये हम कहाँ' हे तिच्या वयाच्या व्यक्तीसाठी विशेषतः संबंधित आहे. कारण त्याचा सोशल मीडियाशी खूप संबंध आहे. अनन्याने एका मुलाखतीत सांगितले की ही मैत्रीसाठीची नवीन कथा आहे. यामध्ये अशा काही भावना आहेत ज्यातून आपण सर्वजण जात असतो. हे खूप उत्साहवर्धक आहे. अनन्या आणि सिद्धांत यांनी यापूर्वी शकुन बत्राच्या 'गेहरियां'मध्ये एकत्र काम केलेलं आहे. दोघेही पुन्हा एकदा स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत. अर्जुन वरेन सिंग दिग्दर्शित 'खो गये हम कहाँ' या चित्रपटात कल्की कोचलिन देखील आहे. या चित्रपटाचे लेखन झोया अख्तर, अर्जुन वरेन सिंग आणि रीमा कागतीने केलेलं आहे. याची निर्मिती रीमा कागती, झोया अख्तर, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर करत आहेत. दरम्यान लिगरमध्ये रम्या कृष्णन, विशू रेड्डी, अली, मकरंद देशपांडे, रोनित रॉय आणि गेटअप श्रीनू देखील होते. अनन्याचे तेलुगू सिनेमात पदार्पणही यातूनच झालं आहे.