डॉ अमोल कोल्हे यांचा 'विठ्ठल विठ्ठला' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस
राजा शिवछत्रपती ( Raja Shivchatrapati ) , स्वराज्य रक्षक संभाजी ( Swarajyarakshak Sambhaji ) , स्वराज्य जननी जिजामाता ( Swarajya Janani Jijamata ) अशा अनेक ऐतिहासिक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते डॉ अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) आता एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला 'विठ्ठल विठ्ठला' चित्रपटात दिसणार आहेत.
बॉलिवुड चित्रपट चॉक अँड डस्टर, नटसम्राट या चित्रपटाचा गुजराती रिमेक, गुजरात११ तसेच सुपरहिट चित्रपट हल्की फुलकी इत्यादी चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत गिलाटर यांनी केले आहे.रणभूमी या चित्रपटानंतर पुन्हा एकदा डॉ अमोल कोल्हे आणि जयंत गिलाटर एकत्र काम करत आहेत.
जयंत गिलाटर यांच्या मते 'विठ्ठल विठ्ठला' हा आजच्या पिढीतील तरूणाई चा विषय आहे. आजची तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीला बळी पडून आपली भारतीय संस्कृती आणि मूल्ये विसरत चालली आहे. आजच्या तरुणांना प्रेरणा देणारा सामाजिक संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे.
'विठ्ठल विठ्ठला' ची निर्मिती संगिता अहिर, बालागिरी वेठगिरी आणि जयंत गिलाटर करणार आहेत , चित्रपटाला डब्बू मलिक संगीत देणार आहे.