Amol Kolhe : अमोल कोल्हेंनी दिली त्यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची  कबुली; पाहा कोण आहे ती?
Admin

Amol Kolhe : अमोल कोल्हेंनी दिली त्यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची कबुली; पाहा कोण आहे ती?

खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे हे वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे हे वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. अमोल कोल्हे सोशल मिडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. ते त्यांचे फोटो, व्हि़डिओ सोशल मिडियावर शेअर करत असतात.

नुकताच अमोल कोल्हे यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं , अशा कविता म्हणायला फार मज्जा वाटते. त्या कविता चांगल्या वाटतात. पण प्रेम व्यक्त करायला ताकद लागते. तेवढीच ताकद प्रेमाची कबुली देण्यासाठी देखील लागते. त्यात जर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल तर आणखी ताकद लागते.एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे तीन प्रकार असतात. A- लग्नाआधी जुळलेलं, B- लग्नानंतर जुळलेलं आणि C-लग्नाआधी जुळून लग्नानंतर देखील सुरु असलेलं. हे सगळं आज सांगण्याची गरज आहे कारण आज मी माझ्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची तुमच्या समोर कबुली देणार आहे. कोण आहे ती? कशी आहे ती? याबद्दल सांगणार आहे. असे या व्हिडिओमध्ये अमोल कोल्हे म्हणत आहेत.

अमोल कोल्हे यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे एका बुलेटसोबत आहे. माझी बुलेट ही मुळची पुण्याची आहे पण सध्या मुंबईत असते. 'मी अनेक वेळा माझ्या बुलेटसोबत वेळ घालवतो. असे कोल्हे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com