Amitabh Bachchan
Amitabh BachchanTeam Lokshahi

Amitabh Bachchan : अमिताभ करणार 'या' गुजराती चित्रपटात एन्ट्री...

बिग बी लवकरच गुजराती चित्रपटात पदार्पण करणार आहेत. अमिताभ यांनी नुकतच 'फक्त महिलाओ मेट' या गुजराती चित्रपटाचे शूटिंग करणार आहे.
Published by :
Published on

बॉलीवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अजूनही आपल्या अभिनयातली ताकद जपलेली आहे. बिग बी जवळपास 5 दशकांपासून बॉलिवूडमध्‍ये अभिनयाची क्षमता सांभाळत आहेत. वयाच्या ७९ व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन फिटनेसच्या बाबतीत कोणत्याही तरुण अभिनेत्याला मात करू शकतील. जाहिरात असो वा चित्रपट अमिताभ सर्वत्र सक्रिय असतात. आता एक बातमी येत आहे की बिग बी लवकरच गुजराती चित्रपटात पदार्पण करणार आहेत. अमिताभ यांनी नुकतच 'फक्त महिलाओ मेट' या गुजराती चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची कॅमिओ भूमिका आहे. परंतु त्यांचा कॅमिओही जोरदार आहे. इतकच नव्हे तर या गुजराती चित्रपटात बॉलिवूडचा शहेनशाह गुजरातीमध्ये संवाद बोलताना दिसणार आहे.

Amitabh Bachchan
Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण!

विशेष म्हणजे अमिताभ या गुजराती चित्रपटासाठी कोणतेही शुल्क घेणार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर या गुजराती चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित हे आहेत. त्यांनी अमिताभ यांना सांगितले होते की चित्रपटातील त्यांचे गुजराती संवाद डबिंग आर्टिस्टकडून डब केले जातील. कारण त्यांना गुजराती बोलण्यात अडचण येऊ शकते. त्यानंतर बिग बी त्यांना सांगतात की आनंद जी आम्ही आमचे काम करू.

एवढेच नाही तर तुम्ही आमचे काम बघा आणि तुम्हाला ते आवडले नाही तर व्हॉईस ओव्हर करून दाखवू असही त्यांनी सांगितलं. पण अमिताभ बच्चन यांनी खरोखरच चमत्कार केला असं म्हणता येईल. त्यांनी अवघ्या पाऊण तासात संपूर्ण डबिंगचे काम पूर्ण केले. अमिताभ बच्चन यांचा गुजराती डेब्यू चित्रपट 'फक्त महिलाओ मेट' (Fakt Mahilao Mate) 19 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Amitabh Bachchan
Amitabh Bachchan and Ajay Devgan : बिग बी आणि अजय देवगणच्या आगामी चित्रपटाचं नाव बदललं
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com