Miss Universe R'Bonney Gabriel
Miss Universe R'Bonney Gabriel Team Lokshahi

अमेरिकेची आर बोनी गॅब्रिएल बनली 'मिस युनिव्हर्स 2022'

जगातील अनेक स्पर्धकांना मागे टाकत अमेरिकेची गॅब्रिएल मिस युनिव्हर्स 2022 बनली आहे.
Published on

नवी दिल्ली : मिस युनिव्हर्स 2022 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेच्या आर'बोनी गॅब्रिएलने मिस युनिव्हर्सचा ताज जिंकला आहे. अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स शहरात 71व्या मिस युनिव्हर्सची स्पर्धा पार पडली. हे जेतेपद पटकावल्यामुळे ती खूप आनंदी आहे. जगातील अनेक स्पर्धकांना मागे टाकत अमेरिकेची गॅब्रिएल मिस युनिव्हर्स 2022 बनली आहे.

मिस युनिव्हर्ससाठी टॉप 3 स्पर्धकांची निवड करण्यात आली. व्हेनेझुएला, यूएस आणि डोमिनिकन रिपब्लिकमधील स्पर्धकांना या टॉप 3 स्पर्धकांमध्ये मिस युनिव्हर्ससाठी स्पर्धा होती. यातून आर'बोनी गॅब्रिएलमे हा किताब पटकवला. मिस युनिव्हर्स गॅब्रिएलचा ताज भारताच्या हरनाज संधूच्या हस्ते तिला घातला गेला. मिस युनिव्हर्स 2022 चा खिताब जिंकल्यानंतर गॅब्रिएल खूपच भावूक दिसत होती. तसेच त्याच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंदही पाहण्यासारखा आहे. मिस युनिव्हर्स आर'बॉनी गॅब्रिएलचा विजयी क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिस युनिव्हर्स या स्पर्धेत 86 देशांनी भाग घेतला होता. भारताचे प्रतिनिधित्व करणारी दिविती राय ही गाऊन राऊंडमधून बाहेर पडली. राष्ट्रीय वेशभूषा फेरीत दिविताने 'सोन चिरैया' बनून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एकेकाळी भारताला 'सोनेरी पक्षी' म्हटले जायचे. दिविताच्या या गोल्डन कलरच्या ड्रेसने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची तीच प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com