Ranveer Singh
Ranveer Singh Team Lokshhi

'आलियाच्या रील एवढं बजेट नव्हतं' व्हिडीओ शेअर करत रणवीर का म्हणाला असं?

'तुम क्या मिले' हे त्या चित्रपटातील गाणे नुकताच चाहत्यांच्या भेटीस आले. या गाण्याला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

सध्या एकापाठोपाठ एक जबरदस्त चित्रपट येत आहेत. त्यातच आता आलिया आणि रणवीर सिंह यांचा नवा चित्रपट चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा नवा चित्रपट चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 'तुम क्या मिले' हे त्या चित्रपटातील गाणे नुकताच चाहत्यांच्या भेटीस आले. या गाण्याला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत आहे. या गाण्याचा एक खास व्हिडीओ आलियाने सोशल मीडियावर शेअर केला होता. आता तिच्या सोबतच रणवीरनं देखील या गाण्यावरील खास व्हिडीओ शेअर केला आहे.

काय आहे व्हिडीओ?

रणवीरनं 'तुम क्या मिले' या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, ' आलियाच्या रील एवढं बजेट नव्हतं.' सोबतच त्याने हा व्हिडीओ आलियाला टॅग केलं आहे. रणवीरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'या' दिवशी रिलीज होणार 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीर यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com