Akshay Kumar : चित्रपटांमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम, अक्षय म्हणाला...
कोरोना काळापासून हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रपटांना प्रेक्षकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र दिसत पहायला मिळतय. सोशल मीडियावर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चित्रपटाला किंवा कलाकाराला ट्रोल केलं जातं. इतकच नव्हे तर अनेक प्रसंगी संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर रक्षाबंधन या चित्रपटाने याप्रकरणी मौन तोडले आहे. यावेळी त्यांनी बहिष्कार मोहिमेमुळे चित्रपटसृष्टीला झालेल्या नुकसानावर चर्चा केली.
नुकताच प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा रक्षाबंधन या चित्रपटावरही ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार बहिष्कार टाकण्यात आला होता. रिलीजच्या तीन दिवसांत अक्कीचा चित्रपट आपली छाप सोडू शकलेला नाही. अशा परिस्थितीत अक्षयने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर आपले मत मांडले आहे. अक्षय कुमारने म्हटलं की चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचे काम काही लोकांकडून केलं जात आहे. माझी विनंती आहे की त्यांनी असं करू नये. चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहनत आणि पैसा लागतो. अशा परिस्थितीत या बहिष्कार मोहिमेमुळे या सर्वांचे मोठे नुकसान होत आहे. चित्रपटसृष्टीच्या नुकसानासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होत असल्याचं अक्षयने सांगितलं . मला खात्री आहे की जे लोक हे करतात त्यांना लवकरच याची जाणीव होईल.