मराठमोळ्या अक्षय इंडीकरचा लॉस एंजेलिसमध्ये डंका , ‘IFFLA’मध्ये अनुराग कश्यप घेणार मुलाखत

मराठमोळ्या अक्षय इंडीकरचा लॉस एंजेलिसमध्ये डंका , ‘IFFLA’मध्ये अनुराग कश्यप घेणार मुलाखत

Published by :
Published on

अक्षय इंडीकर हे नाव चित्रपट सृष्टीसह सिनेरसिकांना आता चांगलेच परिचित झाले आहेत. त्याची मराठीतील पहिली डॉक्यु-फिक्शन फिल्म 'उदाहरणार्थ नेमाडे' असो किंवा 'त्रिज्या' तसेच 'स्थलपुराण'सारखे दर्जेदार चित्रपट असोत. अक्षयच्या या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. यामध्येआता आणखी एका सन्मानाची भर पडली आहे. अक्षयने आपल्या सोशल मिडिया वरून याबद्दल माहिती दिली आहे.

मूळच्या सोलापूरमधील अक्षयने चित्रपटसृष्टीतील पदार्पणातच आंतरराष्ट्रीय मंच गाजवला आहे. आता अक्षयचा 'स्थलपुराण' हा चित्रपट मे महिन्यात लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या 'लॉस एंजेलिस इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'क्लोजिंग फिल्म' म्हणून दाखवला जाणार आहे. व्हिनसन या निर्मिती संस्थेच्या संजय शेट्ये यांची निर्मिती असलेला चित्रपट जगभरात प्रसिद्ध झाला आता या फेस्टिवलला जगभरातील नामांकित दिग्दर्शक, निर्माते कलाकार, तंत्रज्ञ, समीक्षक उपस्थित असतात. खासकरून हॉलिवूडमधील अनेक मोठ्या हस्ती यामध्ये सहभागी होतात. अक्षयचा 'स्थलपुराण' तिथे दाखवला जाणार असल्याने मराठी चित्रपट हा आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार आहे.

इतकेच नव्हे तर या फेस्टिवलनंतर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप हे स्वतः अक्षय इंडीकरची मुलाखत घेऊन त्याचा आतापर्यंचा प्रवास उलगडवणार आहेत. यामुळे अक्षयला मिळालेला हा बहुमान ही मराठी सिनेसृष्टीसाठीच नव्हे तर अवघ्या भारतीय सिनेजगतासाठी अभिमानाची बाब आहे. अनेक संघर्षातून घडून आता इतर धडपड्या कलाकार, दिग्दर्शकांना नेहमीच मदत करणारे दिग्दर्शक अनुराग कश्यप हे स्वतः अक्षयची मुलाखत घेत असल्याने हे मराठी चित्रपट आणि एकूणच तरुण दिग्दर्शक यांच्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com