‘एम्पायर’ मधील कुणाल कपूरने सांगितला घोडेस्वारीबद्द्ल अनुभव
एम्पायर' सिरीज रिलीज होण्याच्या आधीच घोडेस्वारी आणि हत्तीबरोबर चित्रित केलेल्या सीनबद्दल आपला अनुभव सांगितला आहे.
"बऱ्याच वर्षांपासून खूप लोकं मला म्हणत होती कि,तुझे अॅक्शन सीन स्क्रीनवर पाहायला आवडतील.मात्र कोणीच मला तशी संधी देत नव्हतं,पण सुदैवाने अशी संधी मला मिळाली.याचा अनुभव खूपचं अविश्वसनीय होता.'एम्पायरचं' राजस्थानमध्ये युद्धाचे सीन शूट करताना हत्ती,घोडे,आणि आजूबाजूला हजारो कलाकार काम करत होती.खर सांगायचं तर घोडेस्वारी मला आधी आवडत नव्हती, पण 'एम्पायरचं' शूट चालू असताना मला घोडेस्वारी करताना खूपच आनंद मिळाला. असं त्याने इन्स्टाग्राम लाईव्ह सेशन मध्ये सांगितलं आहे.
कुणाल कपूर 'एम्पायर' मध्ये मुघल सरदार जाहीर उददीन मोहोम्म्द बाबुर या सरदाराची भूमिका करत असून अभिनेत्री शबाना आझमी,दिनो मोरिया आणि दृष्टी धमी या सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.