Amitabh Bachchan: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी तब्बल इतक्या कोटींची घेतली अयोध्येत जमीन
अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राजकीय मंडळींसह अनेक सेलिब्रिटीदेखील उपस्थित असणार आहेत. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं अमिताभ बच्चन यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्यापूर्वीच बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी घर बाधंण्यासाठी कोट्यावधी जमीन विकत घेतली. याची चर्चा सर्वत्र होत आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत घरासाठी प्लॉट खरेदी केला आहे. 10,000 स्केअर फुटाच्या या फ्लॉटची किंमत 14.5 कोटी रुपयांच्या आसपास आहे. बिग बींनी 'द हाऊस ऑफ अभिनंद लोढा' या बॅनरअंतर्गत अयोध्येत प्लॉट विकत घेतला आहे. अद्याप बिंग बींनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही.
अयोध्येतल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी बॉलिवूडपासून देशातील अनेक दिग्गज व्यक्ती या कार्यक्रमाचा भाग असणार आहेत. त्यातच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अयोध्येतील राम मंदिराजवळ एक नवीन भूखंड खरेदी केला आहे. त्यांनी येथील जमीन 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' या मुंबईतील विकासक कंपनीमार्फत खरेदी केली आहे. त्याचा आकार 10 हजार चौरस फूट असल्याचे सांगितले जाते. 22 जानेवारी रोजी राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा होणार आहे, त्याच दिवशी प्रोजेक्ट शरयूचे उद्घाटन होणार आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी सरयू एन्क्लेव्हचे लोकार्पण होणार आहे. हे 51 एकरात पसरल्याचे सांगितले जात आहे. याच प्रकल्पात अमिताभ बच्चन यांनी गुंतवणुक केली आहे. "अयोध्येतील सरयूमध्ये अभिनिंद लोढा यांच्या घरासोबत घर बांधण्यासाठी मी उत्साहित आहे. या शहराला माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. अयोध्येतील अध्यात्म आणि संस्कृतीने भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाणारे भावनिक बंध निर्माण केले आहेत. अयोध्येत परंपरा आणि आधुनिकता एकत्र राहतात. मी या ग्लोबल स्पिरिच्युअल कॅपिटलमध्ये माझे घर बनवण्यास उत्सुक आहे," असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.