Laal singh Chaddha
Laal singh ChaddhaTeam Lokshahi

विदेशात प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतोय आमिरचा 'लाल सिंग चड्ढा'

हा चित्रपट भारतात अपयशी ठरला असला तरीही परदेशात लोकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरत आहे.
Published by :
Published on

आमिर खान(Aamir Khan)यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'लाल सिंग चड्ढा' काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर(Kareena Kapoor) मुख्य भूमिकेत आहे. आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट फ्लॉप ठरलाय. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा अधिकृत रिमेक आहे. सकारात्मक रिव्ह्यू मिळाल्यानंतरही हा चित्रपट काही कमाल दाखवू शकला नाही. चित्रपट फ्लॉप होण्यामागचं कारण म्हणजे त्याच्यावर बहिष्काराची मागणी केली जात आहे. बहिष्काराच्या ट्रेंडमुळे हा चित्रपट अपयशी ठरला असला तरीही परदेशात हा चित्रपट लोकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. 'लाल सिंग चड्ढा' आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढलेले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार 'लाल सिंह चड्ढा' यांनी आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडीलाही मागे टाकले आहे.

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर $7.47 दशलक्षचा व्यवसाय केला होता. तर लालसिंग चढ्ढा यां चित्रपटाने $7.5 दशलक्षचा व्यवसाय करून आपलं पाऊल पुढं सरसावलं आहे. त्याचबरोबर एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या आरआरआरने $ 20 दशलक्ष चा व्यवसाय केला आहे. लालसिंग चड्ढा भारतात विशेष अशी कमाई करू शकला नाही. आतापर्यंत हा चित्रपट केवळ 56 कोटींचा व्यवसाय करू शकला आहे. चित्रपट फ्लॉप झाल्याने आमिर खान देखील खूप दुःखी आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी बरीच वर्षे मेहनत घेतली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com