आमिर खानचा चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय…

आमिर खानचा चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय…

Published by :
Team Lokshahi
Published on

आमिर खान (Aamir Khan) नेहमीच काहीतरी वेगळेपण दाखवण्यात दंग असतो. कधी अँड्रॉइड (Android) पासून सुटका तर कधी फिटनेस (Fitness) कडे अधिक लक्ष देत असतो. परंतु आज चक्क आमिरने चित्रपटसृष्टी पासून लांब जाण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूडचे (Bollywood) अभिनेते मिस्टर पेरफेक्शनिस्ट (Mr. Perfectionist) आमिर खानने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला असून त्याने एका कार्यक्रमात त्याच्या आत्मनिरीक्षण मुडविषयी सांगितले. त्यावेळी तो म्हणाला, कोरोना (Corona) काळात इतरांप्रमाणे मीही खूप काही गमावले असून याच काळात खूप काही मिळवले आहे.
गेल्या वर्षी किरण रावपासून (Kiran Rao) वेगळा झालो. गेल्या दोन वर्षात एक वेळ अशी आली की, मी चित्रपट सोडण्याचा विचार केला. त्याचा वैयक्तिक जीवनावर परिणाम झाला.

आमिर बोलतांना म्हणाला की, माझी सर्व शक्ती कामात घालवत असल्याने कुटूंबाला वेळ देता येत नव्हता. जेव्हा अभिनेता झालो, तेव्हा मी कुटुंबाला माझ्यासोबत असल्याचे गृहीत धरून प्रेक्षकांची मने जिंकण्यास सुरुवात केली होती. करिअरच्या सुरुवातीला मात्र अशी काम करावीच लागतात. परंतु मी जवळजवळ 30 ते 35 वर्ष असच काम करत होतो. त्यामुळे कुटुंबाला वेळ देणं शक्य नव्हतं.

मी स्वार्थी आहे. मी स्वतः चा अधिक विचार करतो. परंतु माझ्या कुटुंबाचा, मुलांचा मी कधी विचारच केला नाही. ज्याप्रकारे मी मुलांसोबत वेळ घालवायला हवा. तसं मला कधी जमलच नाही. परंतु हे मला वयाच्या 56-57 व्या वर्षी कळाले ते बरे. नाहीतर 86 व्या वर्षी समजलं असत तर मी काहीच करू शकलो नसतो, असे आमिर म्हणाला.
मुलांना काय हवे काय नाही याचीही कल्पना मला नाही. सिनेमाने Cinema मला कुटुंबापासून इतक्या दूर आणून ठेवलंय. मी यापुढे अभिनय करणार नसल्याचे कुटुंबियांना सांगितले.

याविषयी बोलण्याचे मी टाळत होतो. कारण काहीजण या निर्णयाला माझ्या आगामी 'लाल सिंग चड्डा' (Lal Singh Chadda) चित्रपटाच्या प्रमोशनचा (promotion) मार्ग समजतील. त्यावेळी किरण भावुक झाली. तिने व मुलांनी मला समजावण्याचा बराच प्रयत्न केला. ती म्हणाली की, मीदेखील बॉलिवूड सोडून गेली होती. पण काही दिवसांनी परत आले.
कोरोनोत्तर काळात वेळ मिळाला आणि मी स्वतः चे आत्मपरीक्षण करण्यास सुरुवात केली. मुलांची स्वप्ने, आशा, काळजी आणि भीती याविषयी काहीही माहीत नव्हते. यावरून कुटुंबाला योग्य वेळ देत नसल्याचे लक्षात आले आणि मी चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला, असे आमिरने सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com