आमिर खानच्या मुलाची सिनेइंडस्ट्रीत एंट्री; 'या' साऊथ हिरोईनसोबत करणार रोमान्स
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने अनेक सुपर-डुपर हिट चित्रपट दिले आहेत. 'लाल सिंह चड्ढा' फ्लॉप झाल्यानंतर आमिर खान सध्या ब्रेकवर आहे. मात्र, त्याचा मुलगा जुनैद खान आता लवकरच बॉलीवूडमध्ये एंट्री करणार आहे. जुनैद खान वायआरएफ (YRF)चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर, त्याचा पहिला चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही आणि त्याने त्याचा दुसरा प्रोजेक्टही साइन केला आहे. यामध्ये तो एका मोठ्या साऊथ अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
जुनैदच्या पुढील अनटाइटल्ड चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. चित्रपटात जुनैद खान साऊथची नॅचरल स्टार साई पल्लवीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. YRF च्या पहिल्या चित्रपटानंतर जुनैदचा हा पुढचा प्रोजेक्ट असेल. सुनील पांडे दिग्दर्शित हा चित्रपट एक प्रेमकथा असल्याचे सांगितले जात आहे.
जुनैद तामिळ हिट 'लव्ह टुडे'च्या हिंदी रिमेकमध्ये बोनी कपूर आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरसोबत दिसणार आहे, अशाही बातम्या आहेत. खुशी कपूर ओटीटीवर द आर्चीज मधून डेब्यू करत आहे. 'लव्ह टुडे'चा रिमेक ही एक मोठी ऑफर आहे. हा चित्रपटाचे शुटींग या वर्षाच्या अखेरीस सुरू होऊ शकतो. 'लव्ह टुडे' हा 2022 चा तामिळ रोमँटिक कॉमेडी-ड्रामा आहे.