बॉक्स ऑफिसवर आमिर-अक्षय कुमार फेल; साऊथच्या चित्रपटाचीच पुन्हा जादू,'सीता रामम'ची दमदार कमाई
आमिर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन चित्रपट प्रदर्शित झाले. परंतु, दोघांचेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करु शकली नाही. परंतु, या दोन्ही दिग्गजांना पछाडून साऊथ सिनेमाने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली आहे. नुकतात रिलीज झालेला सीता-रामम हा साऊथ चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहेत. एवढेच नव्हेतर तरुण वर्ग या चित्रपटांच्या प्रेमात पडले आहेत.
आमिर आणि अक्षयचे चित्रपट प्रेक्षकांना आसुसलेला असतानाच साऊथ स्टार दुलकर सलमानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही कमाई करत आहे. समीक्षक आणि चित्रपट रसिकांना हा चित्रपट खूपच आवडला आहे. सीता-रामाम हा चित्रपट एक पीरियड ड्रामा असून 1964 ची लव्हस्टोरी दाकवली आहे. या चित्रपटाची कथा लेफ्टनंट रामची आहे. तो लष्करी अधिकारी असून काश्मीर सीमेवर तैनात असतो. त्याला सीता महालक्ष्मीचे निनावी प्रेमपत्रे येतात. यानंतर राम सीतेला शोधण्याच्या मोहिमेवर निघतो. तो सीतेचा शोध घेतो आणि तिला प्रपोज करू इच्छितो.
या चित्रपटाद्वारे बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवले असून सीतेच्या भूमिकेत झळकली आहे. तर, दुलकर सलमानने रामची भूमिका केली आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात रश्मिका मंदानाही असून तिने आफरीनची भूमिका निभावली आहे. याचे दिग्दर्शन हनु राघवपुडी यांनी केले आहे.
सीता-रामम चित्रपटाचे बजेट केवळ 30 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. तर, या चित्रपटाने रिलीझ होताच पहिल्याच दिवशी जगभरात 5.25 कोटी कमावले. आतापर्यंत या चित्रपटाने 50 कोटींची कमाई केली आहे.