बिग बॉसचा विजेता बनल्यानंतर प्रसिद्धीझोतात आलेला यूट्यूबर एल्विश यादव अडचणीत आला आहे. नोएडा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
नोएडा पोलिसांनी सेक्टर 49 मध्ये छापा टाकून 5 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी येथून 5 कोब्रा जप्त केले असून त्यांच्याकडे सापाचे विषही सापडले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या लोकांची चौकशी केली तेव्हा बिग बॉस विजेता एल्विश यादवचे नावही समोर आले. पोलिसांनी एल्विशविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
एल्विशने अवैधरित्या रेव्ह पार्ट्यांचे आयोजन आणि तस्करी केल्याचा आरोप आहे. भाजपा खासदार मनेका गांधी यांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडलेल्या आरोपीच्या ताब्यातून 20 मिली विष आणि 9 जिवंत साप जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच त्याचा लोकांच्या तस्करीतही संबंध होता. नोएडा पोलिसात तक्रार दाखल केली. त्याआधारे नोएडा पोलिसांनी कारवाई केली आहे.भाजपा खासदार मनेका गांधी यांच्या संस्थेला नोएडा आणि एनसीआरमधील फार्म हाऊसमध्ये सापाच्या विषामुळे होणाऱ्या रेव्ह पार्ट्यांची माहिती मिळाली होती. या रेव्ह पार्ट्यामध्ये परदेशी मुलींनाही नाचविले जात होते अशी माहिती मिळाली होती.