67th National Film Awards : रजनीकांत यांचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मान
दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार 'थलाइवा' म्हणून प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना आज ६७ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो.
चित्रपट प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची ( 67th National Films Awards ) घोषणा मार्च महिन्यात करण्यात आली होती.
दक्षिण भारतात आहे देवाचा दर्जा
रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बेंगलुळूमधील एका मराठी कुटुंबात झाला होता. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी कठोर परिश्रम आणि संघर्षानंतर टॉलीवूडमध्ये विशेष स्थान मिळवलं. आपल्या खास स्टाइल आणि अंदाजामुळे त्यांनी बॉलीवूडमध्येही स्वतःचं वेगळ स्थान निर्माण केलं. दक्षिण भारतात चाहते रजनीकांत यांना देवाच्या स्थानी मानतात.