सलमान खानची बहिण अर्पिताचे 5 लाखांचे हिऱ्यांचे कानातले चोरीला

सलमान खानची बहिण अर्पिताचे 5 लाखांचे हिऱ्यांचे कानातले चोरीला

काही तासातच केली पोलिसांनी आरोपीला अटक
Published on

सलमान खानची बहीण अर्पिता खानबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. अर्पिताच्या राहत्या घरातून हिऱ्याचे कानातले चोरीला गेले आहेत. याची किंबत तब्बल पाच लाख रुपये आहे. याप्रकरणी अर्पिता खानने मुंबईतील खार पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. संदीप हेगडे (वय 30) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिता खान हिच्या राहत्या घरातून 5 लाखांचे हिऱ्याच्या कानातल्याची चोरी झाली होती. घरातील मेकप ट्रेमधून कानातले चोरी झाले होते. याप्रकरणी मंगळवारी तक्रार केली असता काही तासातच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. व अर्पिताच्या घरात काम करणाऱ्या नोकराने चोरी केल्याचे समोर आले आहे. काही तासांतच पोलिसांनी विलेपार्लेमधून आरोपी संदीप हेगडे याला अटक केली आहे.

दरम्यान, अर्पिता खानने अभिनेता आयुष शर्मासोबत लग्न केले आहे. दोघेही दोन मुलांचे पालक आहेत. आयुष शर्मा सध्या बॉलीवूडमध्ये करिअर करण्याच्या प्रयत्नात आहे. तो अखेरचा सलमान खानसोबत 'अंतिम' चित्रपटात दिसला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com