देवी विसर्जनाससाठी गेलेल्या बाप-लेकाचा पाण्यात बुडून करूण अंत

देवी विसर्जनाससाठी गेलेल्या बाप-लेकाचा पाण्यात बुडून करूण अंत

Published by :
Published on

अकोला शहरातील शिवसेना वसाहत येथील एका देवी मंडळ सोबत देवी विसर्जनासाठी गेलेल्या वडिल आणि मुलगा बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी रात्री उशिरा हि घटना घडली आहे. वडील सुनिल वाघाळकर बुडत असताना बघून मुलगा अभिषेक वाघाळकर वडिलांना वाचवायला उडी घेतली. आणि तोही पाण्यात बुडाला.

रात्रीची वेळ झाल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडली. कुरणखेड येथील श्री चंडिका माता आपत्कालीन बचाव पथक व वंदे मातरम आपत्कालीन बचाव पथक कुरणखेड यांच्यातर्फे शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र रात्रीची वेळ असल्याने शोध पथकास अडथळे निर्माण होत होते. अखेर आज सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली. अखेर सकाळी 10 वाजता दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com